-->

‘सीरम इन्स्टिट्यूट’ला लागलेल्या आगीने 1000 कोटी रूपयांचे नुकसान – अदर पुनावाला

बीसीजी आणि रोटाव्यायरस उत्पादन व साटौणीवर परिणाम

पुणे – सीरमला लागलेल्या आगीने एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. रोटाव्हायरस आणि बीसीजीच्या लस उत्पादन आणि साठवणुकीला त्याचा फटका बसला आहे. मात्र, कोविशिल्डच्या उत्पादनावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे आगीनंतर दुसऱ्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी सांगितले.

गुरूवारी आग लागलेली इमारत नवी होती. तेथे अन्य उत्पादनांचे काम सुरू करण्यात येत होते. तेथे कोणताही साठवण आथवा उत्पादन होत नव्हते. ते पूर्णत: नवे युनीट होते. तेथे उपकरणे बसवण्याचे काम सुरू होते. तेच आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे सांगून ते म्हणाले, आम्ही जे गमावले ते भविष्यातील नियोजन होते.

पूनावाला यांनी सुरवातीला कोणतीही जीवित हानी नसल्याचे ट्‌विट केले होते. त्याबाबत खुलासा करताना ते म्हणाले, आम्हाला सुरवातीला कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्याबाबत माहिती नव्हती. ज्यावेळी आम्हला कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली, ती आम्ही पुढे केली. मात्र धूर गेल्यानंतर आम्हाला मृतदेह आढळले. आमच्याकडे तृतीय पक्षीय कर्मचाऱ्यांची पूर्ण यादी नाही. तेथे सध्या किती जण काम करतात, याचीही आम्हाला माहिती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

चौकट
ही आग पावणे दोन ते सव्वा दोनच्या सुमारास लागली. साडेचार वाजण्याच्या सुमारास ती आटोक्‍यात आणली. अग्नीशामक दलाचे दहा बंब यासाठी कार्यरत होते. त्याशिवाय चार टॅंकर आणि अन्य सामुग्री तैनात करण्यात आली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.