ओडिशा, बंगाल अन्‌ झारखंडला 1000 कोटींची मदत

नवी दिल्ली – यास चक्रीवादळ पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी झालेल्या नुकसानीची आढावा बैठक घेऊन बाधित भागाचे सर्वेक्षण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत यास चक्रीवादळामुळे प्रभावित लोकांबद्दल शोक व्यक्त केला. तसेच ओडिशा, बंगाल आणि झारखंडला तातडीने मदत कार्यांसाठी 1000 कोटींची आर्थिक मदत जाहीर केली.

पंतप्रधानांनी केंद्र सरकारला नुकसानभरपाईच्या पूर्ण व्याप्तीचे आकलन करण्यासाठी राज्यांची भेट घेण्यासाठी एक आंतर मंत्री दल नेमण्याचे निर्देश दिले. यासह बाधित भागातील पायाभूत सुविधांच्या जीर्णोद्धार आणि पुनर्रचनेसाठी केंद्राने सर्व शक्‍य मदतीची ग्वाही दिली. पंतप्रधानांच्या बंगालमधील आढावा बैठकीत ममता बॅनर्जी यांनी भाग घेतला नाही.

पंतप्रधानांनी मृताच्या नातलगांना दोन लाख रुपये आणि चक्रीवादळात जखमींना 50 हजार रुपयांची मदत दिली. या चक्रीवादळाच्या परिणामी ओडिशाचे सर्वाधिक नुकसान झाले. पश्‍चिम बंगाल आणि झारखंडच्या काही भागांवरही याचा परिणाम झाल्याचे पंतप्रधानांना सांगण्यात आले.

मोदी यांनी तत्काळ मदत कार्यांसाठी 1000 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. ओडिशाला तातडीने 500 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. पश्‍चिम बंगाल आणि झारखंडसाठी 500 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे.

केंद्र सरकार नुकसानभरपाईच्या प्रमाणाचे आकलन करण्यासाठी राज्यांच्या भेटीसाठी एक आंतर-मंत्री दल नेमेल, त्या आधारावर पुढील मदत दिली जाईल. केंद्र सरकार या कठीण काळात राज्य सरकारांशी मिळून लक्षपूर्वक काम करेल, बाधित भागात पायाभूत सुविधा पुनर्संचयित करण्यासाठी आणि पुनर्बांधणीसाठी सर्वतोपरी मदत करेल, असे आश्‍वासनही मोदींनी दिले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.