व्यापक सापेक्षता सिद्धांताच्या पडताळ्याला 100 वर्षे पूर्ण

शैक्षणिक व संशोधन संस्थांमध्ये विविध कार्यक्रम

पुणे – थोर वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाईन यांच्या व्यापक सापेक्षता सिद्धांताच्या पडताळ्याला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त जगभरात विविध ठिकाणच्या शैक्षणिक, संशोधन संस्थांमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले.

आइनस्टाईन यांनी 1905 मध्ये स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी (विशेष सापेक्षता सिद्धांत) मांडून अवकाश व काल परस्परावलंबी आहेत, असे विशद केले होते. यानंतर सन 1916 मध्ये त्यांनी जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी (व्यापक सापेक्षता सिद्धांत) मांडला. त्यात त्यांनी अवकाश, काल व वस्तुमान ही तिन्ही तत्वे परस्परावलंबी आहेत किंवा यातील कोणतीही दोन तत्वे विश्‍वातून नाहीशी केल्यास तिसरे तत्वही अस्तित्वात राहणार नाही, असे स्पष्ट केले आहे. सिद्धांताच्या पुष्टीसाठी आइनस्टाईन यांनी तीन कसोट्या सूचविल्या होत्या. या सिद्धांताला प्रथम पडताळा सन 1919 मध्ये मिळाला होता. त्यानंतर अलिकडेच मिळविलेली कृष्णविवराची प्रतिमेमुळेही सिद्धांताला पुष्टी मिळते आहे.

गेल्या अनेक वर्षात विविध शास्त्रज्ञांनी खग्रास सूर्यग्रहांचा अभ्यास व निरीक्षणे केली. त्याचे फोटोही घेतले. त्यावरुन सिद्धांतांचे पुरावे मिळाले आहेत. सुमारे शंभर वर्षांपासून यांचा शोध सुरू होता. त्यात यश मिळाले आहे. यानिमित्त जगातील विविध ठिकाणच्या शैक्षणिक संस्था, संशोधन संस्थांमध्ये व्याख्याने, कार्यशाळा, परिषदा, प्रदर्शने घेण्यात आली आहेत. यातून विज्ञान आणखी लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, अशी माहिती पुण्यातील मुक्तांगण विज्ञान प्रसार केंद्रातील राहूल माने यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)