बर्लिन – जर्मनीमध्ये पूर्वी एका कॉन्सट्रेशन कॅम्पचा सुरक्षा रक्षक राहिलेल्या एका 100 वर्षे वयाच्या व्यक्तीवर खटला दाखल करण्यात आला आहे. नाझी काळात करण्यात आलेल्या छळांबद्दल खटला कदाखल करण्यात आलेले हे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरले आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्याकाळात बर्लिन जवळच्या सचसेनहुसैन येथील छळ छावणीचे ते सुरक्षा रक्षक होते. त्यांच्यावर तब्बल 3,518 जणांच्या हत्येला सहाय्य करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. नुरोप्पित कोर्टात त्यांच्यावर हा खटला चालवला जात आहे.
हा खटला ज्या 100 वर्षाच्या सुरक्षा रक्षकावर चालवण्यात येत आहे, त्यांचे नाव कोर्टाकडून घोषित केले गेलेले नाही. 1942 ते 1945 दरम्यानच्या कालावधीत ते सचसेनहुसैन येथील छळ ळावणीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून ते काम करत होते. नाजी पार्टीच्या संसदीय विभागाचे सदस्य म्हणून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. या संशयिताचे वय लक्षात घेऊनही त्यांच्यावर खटला चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सचेनहुसैन येथील छळ छावणीमध्ये 1936 ते 1945 दरम्यान तब्बल 2 लाख जणांना कोंडण्यात आले होते. उपासमार, आजारपण, कष्टाचे काम आणि अन्य कारणांमुळे हजोरो जणांचा या छळ छावणीमध्ये मृत्यू झाला होता. तर शेकडो जणांना फाशी, गोळ्या घालून आणि गॅस चेंबरमध्ये कोंडून मारण्यात आले होते.