लवकरच 100 रुपयांच्या नव्या नोटा येणार

नवी दिल्ली: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया लवकरच 100 रुपयांची नवीन नोट चलनात आणणार असल्याची माहिती आरबीआयने सादर केलेल्या वार्षिक अहवालामध्ये दिली आहे. हा अहवाल गुरुवारी जारी करण्यात आला. आरबीआयने 100 रुपयांच्या नोटांना वार्निशचा कोटिंग देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे 100 रुपयांच्या या नव्या नोटांचे आयुष्य वाढणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर ही नोट जारी करण्यात येणार आहे. त्यानंतर 100 रुपयांच्या सर्व नोटांना वार्निश कोट करण्यात येणार असल्याचे आरबीआयने सांगितले.

आपल्या घरामध्ये लाकडी फर्निचर असते. या फर्निचरला एक चमकदार आणि पारदर्शी कोटिंग केलेले दिसते. हे कोटिंग वार्निशचे असते. यामुळे फर्निचरचे आयुष्य वाढते. आता नोटावर देखील अशा पध्दतीने वार्निशचे पातळ कोटिंग चढवण्यात येणार आहे. त्यामुळे नोटाचे आयुष्य वाढणार आहे. तसेच ही नोट लवकर खराब होणार नाही किंवा फाटणार नाही.

वार्निश नोटा जगातील इतर देशांमध्ये चलनात वापरल्या जातात. या नोटांबाबतच्या चांगल्या अनुभवामुळेच रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने या नोटा चलनामध्ये आणण्याचा निर्णय घेतला. सध्या देशामध्ये त्याची सुरुवात 100 रुपयांच्या नोटांपासून होणार आहे. तर, सध्या चलनात असलेली 100 रुपयांची नोट लवकर खराब होते, ती लवकर फाटते. त्यामुळे आरबीआयला दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या नोटा बदलाव्या लागतात. जगातील बरेच देश या समस्येला तोंड देण्यासाठी प्लास्टिकच्या नोटा देखील वापरतात.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×