पुणे : गुलटेकडी येथील ‘दारूवाला एज्युकेशन सोसायटीचे’ क्रिसेंट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. एकूण 163 विद्यार्थ्यांनी दहावी बोर्डाची परीक्षा दिली होती. यापैकी 124 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत तर 39 विद्यार्थी प्रथम श्रेणी घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.
श्रुती सुराणा या विद्यार्थिनीने 95.4% गुण मिळवून शाळेमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. अयमन शेख या विद्यार्थिनीने 95.2% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तर ख्याती यादव या विद्यार्थिनीने 94.8 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. यावर्षी तीनही क्रमांक मिळविण्यात मुलींनी बाजी मारली आहे.
क्रिसेंट हायस्कूलने एस.एस.सी. परीक्षेत 100% यश मिळविण्याची परंपरा या वर्षीही कायम ठेवली आहे. मुख्याध्यापिका एम. ए. दारूवाला यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले. फराह दारूवाला व हिना दारूवाला यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शालेय व्यवस्थापन समिती व पालक वर्गाने शिक्षकांचे कौतुक केले.