राज्यभरात 100 टक्‍के विद्युतीकरण पूर्ण; महावितरणचा दावा

पुणे – राज्यातील सर्व गावे व वाड्या वस्त्यांच्या विद्युतीकरणाचे काम हे 100 टक्के पूर्ण झाले आहे, असा दावा महावितरण कंपनीने केला आहे. केंद्र शासनाची दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना आणि सौभाग्य योजना यांच्या माध्यमातून हे विद्युतीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती महावितरणच्यावतीने देण्यात आली आहे.

महावितरणने यंदा शंभर टक्के विद्युतीकरणाचे उद्दिष्ट ठेवले होते. ते आता पूर्ण झाले आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील 15 लाख 17 हजार 922 घरकुलांना महावितरणकडून नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. याशिवाय महाराष्ट्र राज्य उर्जा विकास प्राधिकरण (महाउर्जा) तर्फे राज्यात एकूण

26 हजार 11 घरकुलांना सौर उर्जा संचाद्वारे वीज पुरवठा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात तब्बल चार हजार गावे वाड्या-वस्त्या अंधारात असल्याचे संदेश पसरत असल्याचेही महावितरणच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.