पिंपरी – करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी संख्या कमी करण्यात आली होती. सध्या रूग्ण संख्या कमी झाल्याने शंभर टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. सोमवारपासून पालिकेत शंभर टक्के अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
पालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसह दिव्यांगांनाही कामांवर हजर राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या सर्व कार्यालयांत सोमवार (दि.14) पासून 100 टक्के उपस्थिती दिसणार आहे. पालिका कार्यालयांमध्ये कोरोनाचे संसर्ग होऊ नये म्हणून पालिका कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्के करण्यात आली होती. सध्या कोरोनाची लाट ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.