पीरसाहेबांच्या उत्सवात 100 मल्लांचा सहभाग

चिंबळी, दि. 15 (वार्ताहर) -मोई (ता. खेड) येथे दरवर्षी प्रमाणे पारंपरिक धार्मिक पध्दतीने पीरसाहेब महाराजांच्या उत्सावानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात कुस्त्यांचा आखाडा चांगलाच रंगला. या आखाड्यात 100 मल्लांचा सहभाग उल्लेखनीय ठरला.

मोई (ता. खेड) येथे पीरसाहेब महाराजांना ग्रामस्थांच्या वतीने बुधवारी (दि. 11) आणि शुक्रवारी (दि. 13) रात्री 9 वाजता आमदार दिलीप मोहिते आणि सरपंच राहुल गवारी, महाळुंगे इंगळे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के, तसेच सर्व उपस्थित सदस्य आणि मान्यवरांच्या हस्ते गलब व शेरा चढविण्यात आला. शुक्रवारी (दि. 13) रात्री 10 वाजता करमणुकीच्या कार्यक्रमात रघुवीर खेडकर यांसह कातांबाई सातरकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

शनिवारी (दि. 14) सकाळी 9 वाजता लोकनाट्य तमाशाच्या हजेरीचा कार्यक्रम आयोजित करून दुपारी 4 ते रात्री 7 वाजेपर्यंत भव्य निकाली कुस्ताचा आखाडा आयोजित करण्यात आला होता. या कुस्ती स्पर्धेत सुमारे 100 मल्लांनी सहभाग घेतला. यामध्ये पाच निकाली कुस्त्या आयोजित करण्यात आल्या होत्या.

यामध्ये पै. चेतन कन्दरे, वि. पै. अक्षय गरूड यांची निकाली कुस्ती निकाली झाली नसल्याने बरोबरीत सोडविण्यात आली. या कुस्ती स्पर्धेत पंच म्हणून रवी गवारे, दत्ता गवारे, विठ्ठल गवारे, बाळासाहेब गवारे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन पाटील गवारे व सोमनाथ फलके यांनी केले.

या कार्यक्रमासाठी खेड ता. भा. व जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, पै. तानाजी काळोखे, विशाल सोनवणे, संजय कड, सरपंच राहुल गवारी, किरण गवारे, आनंद गवारे, देवीदास मेदनकर, संतोष गवारी, आण्णा करपे, अविनाश गवारी, संतोष गवारी, मंगेश गवारे, मारुती येळवंडे, समीर गवारे, आनंदा कर्फे, नारायण गवारी, भगवान साकोरे, नीलेश गवारे, बाळासाहेब बिडकर, दिंगबर गवारे, सादिक गवारे, जालिंदर गवारे आदी मान्यवरांसह सर्व ग्रामस्थ तसेच आजी माजी पदाधिकारी
उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.