बंगळुरू : कर्नाटकाचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी आपल्या मतदार संघाच्या विकास कामांसाठी एक हजार कोटी रुपये दिले, असा दावा कॉंग्रेसचे एक बंडखोर अपात्र आमदार नारायण गौडायांनी केला. त्यामुळे कॉंग्रेस आणि जनता दलाच्या आमदार फोडण्यात पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा सहभाग होतता, असे सांगणारूी ध्वनीफीत व्हायरल झाल्याने अडचणीत आलेल्या येडीयुरप्पा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
(कुमारस्वामी यांचे सरकार पडण्यापुर्वी) कुणीतरी एकाने मला येडीयुरप्पा यांच्या घरी नेले. त्यांनी मला बसायला सांगितले. त्यावेळी ते देवपूजा करत होते. त्यानंतर ते आले आणि म्हणाले, मला पुन्हा मुख्यमंत्री बनण्यासाठी मदत कर. मी माझ्या कृष्णराजपेट मतदार संघाच्या विकासासाठी 700 कोटी रुपयांची मागणी केली होती, त्यापेक्षा 300 कोटी रुपये मी मंजूर करेन असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंथर त्यांनी हा निधी मंजूर केला.
तुन्हाला वाटतं मी एका महान माणसाला पाठींबा दिला आहे? मलाही तसंच वाटले. पण तातडीने येडीयुरप्पा यांनी मला बंडखोरांशी काही देणे घेणे नसल्याचे सांगितले होते. आपल्या मतदार संघातील विकास कामांच्या निधीसाठीच मी येडीयुरप्पा यांना पाठींबा दिला, असेही गौडा म्हणाले.