100 अब्ज डॉलरच्या भारतीय कंपनीची गोष्ट

माहिती तंत्रज्ञान क्षेत्र संकटात आहे, असे गेले काही दिवस म्हटले जाते आहे. देश, कंपन्यांत असलेली स्पर्धा, डॉलरच्यादरात होत असलेला बदल आणि त्यातील नोकऱ्या हिरावून घेणारे नवे तंत्रज्ञान हे त्याचे कारण आहे. पण गेल्या वर्षभरात भारतात वाढलेले डिजिटल व्यवहार, जीएसटीमुळे त्यात पडलेली भर आणि डॉलर रुपयाच्या तुलनेने वधारत असल्याने माहिती क्षेत्रातील कंपन्या पुन्हा एका गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेत आहेत. गेल्या दोन दशकात या कंपन्यानी गुंतवणूकदारांना मालामाल केले असून त्या कंपन्यांना चांगले दिवस आले आहेत.टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस म्हणजे टीसीएस कंपनीचे नुकतेच लागलेले तिमाही निकाल तरी हेच सांगतात.

भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस म्हणजे टीसीएस कंपनीचे मार्च अखेरचे तिमाही निकाल अलीकडेच जाहीर झाले. या कंपनीला तब्बल सहा हजार 904 कोटी रुपये नफा झाला. ही बातमी आल्यावर शेअर बाजारात कंपनीचा शेअर चांगलाच वर (3400+) गेला आणि या कंपनीचे बाजारातील मूल्य विक्रमी 100 अब्ज डॉलर इतके झाले. इतके अधिक मूल्य असणारी ती पहिली भारतीय कंपनी ठरली. 100 अब्ज डॉलर म्हणजे 6.53 लाख कोटी रुपये. एवढे मूल्य होणे, हा जगात एक महत्वाचा टप्पा मानला जातो. 100 अब्ज डॉलर मूल्य असलेल्या जगात फक्त 63 कंपन्या आहेत.

टीसीएसचे बाजारमूल्य 100 अब्ज डॉलर झाले म्हणजे नेमके किती झाले, याचा अंदाज येत नाही. पण ते तुलनात्मक पद्धतीने समजून घेतले तर त्याचे महत्व अधोरेखित होते. उदा.100 अब्ज डॉलरची कंपनी म्हणजे जगातील 128 देशांच्या जीडीपीपेक्षा अधिक मोठी कंपनी. पाकिस्तान शेअर बाजाराचे जेवढे एकूण मूल्य आहे, त्यापेक्षा मोठी कंपनी. भारताच्या अर्थसंकल्पीय खर्चाच्या एक तृतीआंश इतकी मोठी कंपनी. भारत आणि जपानच्या एका वर्षांच्या संरक्षण खर्चाइतकी मोठी कंपनी. भारतीय रिझर्व बॅंकेत जेवढे परकीय चलन आहे, त्याच्या एक चतुर्थांश पैसा असलेली कंपनी.

भारतीय शेअर बाजारातील सुमारे 5000 कंपन्याचे एकूण मूल्य सध्या 151 लाख कोटी आहे, म्हणजे त्यात या एकट्या कंपनीचा वाटा 4.43 टक्के एवढा आहे! 14 वर्षांपूर्वी या कंपनीची शेअर बाजारात नोंद झाली, त्यावेळी तिचे बाजारमूल्य 47 हजार 232 कोटी होते, जे आज 6.53 लाख कोटी झाले आहे. याचा दुसरा अर्थ असा की तेव्हा जर कोणी 10 हजार रुपये या कंपनीत गुंतविले असते तर त्याचे आज एक लाख 40 हजार झाले असते. म्हणजे या कंपनीने गुंतवणूकदारांना दरवर्षी सरासरी 22 टक्के इतका परतावा दिला आहे. हे निकाल जाहीर करतानाही कंपनीने शेअरधारकांना एकास एक बोनस जाहीर केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)