अल्पवयीन मुलीशी लग्न करून बलात्कार करणाऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पुणे  – अल्पवयीन मुलीशी बेकायदेशीरपणे लग्न करून बलात्कार करणाऱ्याला पीडित, फिर्यादी असलेली तिची आई फितुर झाली असतानाही न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरी आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश आर.जी.देशपांडे यांनी सुनावली. डीएनए चाचणीचा पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.

अशोक रमेश कदम (वय 29) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी काम पाहिले. त्यांनी 8 साक्षीदार तपासले. सहायक पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी या प्रकरणाचा तपास केला.

न्यायालयीन कामकाजासाठी कॉन्स्टेबल एस.व्ही.चिकणे यांनी मदत केली. 15 मे 2015 आणि त्यापूर्वीच्या सहा महिन्याच्या कालावधीत हा प्रकार घडला. पीडितेचे कुटुंबिय आजीकडे राहायला गेले होते. त्यावेळी पीडित आणि अशोक यांची ओळख झाली.

फिर्याद देण्याच्या सहा महिन्यापूर्वी पीडित घरातून निघून गेली होती. तिसऱ्या दिवशी परत आली. त्यावेळी तिने मैत्रिणीकडे गेल्याचे सांगितले. त्यानंतर दोन महिन्याने अशक्तपणा आल्याने पीडितेला डॉक्‍टरकडे नेण्यात आले. त्यावेळी ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. त्यावेळी विश्‍वासात घेतल्यावर तिने घडलेला प्रकार सांगितला.

अशोक याने भाड्याने घेतलेल्या खोलीत वेळोवेळी तिच्याशी शरीर संबंध ठेवले. आळंदी येथे नेवून लग्न केले. त्याबाबत सर्टीफिकेट दाखविले. मात्र, ती अल्पवयीन असल्याने लग्न ग्राह्य धरता आले नाही. त्यामुळे पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार 376 आणि बाललैगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी ऍड. शुभांगी देशमुख यांनी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.