10 हजार पोलीस करोनाबाधित

मुंबई – राज्यात करोनाचा संसर्ग अधिकच वेगाने वाढत आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच आता करोना योद्धे असलेल्या पोलिसांना देखील करोनाचा झपाट्याने संसर्ग होताना दिसत आहे. राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता 10 हजाराच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचली आहे.

मागील चोवीस तासांत राज्यभरात 232 नवे करोनाबाधित पोलीस आढळले असून, एका पोलिसाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर राज्यातील करोनबाधित पोलिसांची संख्या 9 हजार 449 वर पोहचली आहे. यामध्ये 971 अधिकारी व 8 हजार 478 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सद्यस्थितीस 219 अधिकारी व 1713 कर्मचारी मिळून 1 हजार 932 पोलिसांवर उपचार सुरू आहेत. तर, 743 अधिकारी व 6671 कर्मचारी मिळून एकूण 7 हजार 414 पोलीस आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. तसेच, आतापर्यंत 103 पोलिसांचा मृत्यू झालेला असून, यामध्ये 9 अधिकारी व 94 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.