सासवड, (प्रतिनिधी) – पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना 10 टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे, अशी माहिती पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी दिली.
सहकारमहर्षी स्व. चंदूकाका जगताप यांनी स्थापन केलेल्या सासवड येथील पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात येथील सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन येथे संस्थेच्या अध्यक्षा आनंदीकाकी चंदुकाका जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार जगताप यांच्या उपस्थितीत पार पडली.
सभेच्या सुरुवातीला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. चंदूकाका जगताप यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन झाले. ज्ञात-अज्ञात दिवंगत नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ज्येेष्ठ संचालक डॉ. विनायक खाडे यांनी प्रास्ताविक केले.
सरव्यवस्थापक अनिल उरवणे यांनी अहवालवाचन केले. यावेळी दिलीप गिरमे, विठ्ठल मोकाशी, वसंतराव ताकवले, संजय भोंगळे, सचिन दिवेकर, दत्तात्रय गायकवाड, रामचंद्र खोपडे आदी सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला.
यावेळी ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप, प्रदीप पोमण, सुनिता कोलते, महादेव टिळेकर, देविदास कामथे, संदिप फडतरे, शाहजान शेख, कुंडलिक मेमाणे, प्रकाश पवार, संभाजी काळाणे, बाळासाहेब झुरंगे, समरादित्य जगताप यांसह संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णा शेट्टी, संचालक अंकुश जगताप, कल्याण जेधे, नारायण कुंजीर, नंदकुमार निरगुडे,
भारती देशमुख, युगंधरा कोंढरे, बाळासो काळाणे, नंदकुमार निरगुडे, राजेश इंदलकर, सुनील खोपडे, घनःश्याम तांबे, बाबा चौंडकर, व्यवस्थापक सतीश शिंदे यांसह सर्व संचालक, सल्लागार, सभासद, शाखा प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. संचालक आनंदराव घोरपडे यांनी आभार मानले.
31 मार्च 2024 अखेर ठेवी : 313 कोटी 10 लाख रुपये
अधिकृत भागभांडवल : 25 कोटी
राखीव निधी : 12 कोटी 7 लाख 90 हजार रुपये
स्थावर मालमत्ता : 4 कोटी 45 लाख
गुंतवणूक : 81 कोटी 20 लाख
कर्ज वाटप : 241 कोटी 63 लाख रुपये
निव्वळ नफा : 99 लाख 13 हजार रुपये
सतत ऑडिट वर्ग : अ
शाखा : 13
स्वतःच्या मालकीच्या इमारतीत शाखा : 9