दहा लाखांचे पार्सल लंपास; तिघांना अटक

पिंपरी  – कंटेनरमधून बंगलुरु येथून पुण्याला येत असताना ऍमेझॉन कंपनीचे पार्सल काढून घेतल्याची घटना समोर आली आहे. 26 ते 27 एप्रिल दरम्यान कंटेनरचालकांनी 10 लाख 25 हजार रुपयांचे 94 पार्सल काढून लंपास केले. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. तर तीन आरोपी अद्याप फरार आहेत.

याप्रकरणी मयूरेश मोहन वडके (वय 37, रा. भिवंडी, ठाणे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कुशल राजेंद्र सिंग चौधरी, राजकुमार कालीचरण दिमर, प्रल्हाद सुखराम (तिघे रा. उत्तरप्रदेश) या तिघांना अटक केली आहे. तर लोकेशकुमार सुलतानसिंग, बिजू, केशव हे तिघे अद्याप फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूरेश यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांच्या कंटेनरवर कुशल आणि राजेंद्र सिंग चालक म्हणून काम करतात.

राजकुमार चालवत असलेल्या कंटेनरवर प्रल्हाद व केशव क्‍लीनर म्हणून काम करतात. तर कुशल दुसरा कंटेनर चालवतो, त्यावर लोकेश आणि बिजू यावर क्‍लीनर म्हणून काम करतात. मयूरेश यांनी बंगळूरू येथून ऍमेझॉन कंपनीचे पार्सल कंटेनरमध्ये भरून दिले. हे पार्सल भोसरी एमआयडीसी येथील ऑफिसमध्ये न्यायचे होते. सर्व आरोपींनी मिळून दोन फेऱ्यांमध्ये कंटेनर मधून 10 लाख 25 हजार रुपये किमतीचे 94 पार्सल काढून घेतले. भोसरी एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×