वेनेजुएलामध्ये १० लाखाची चलनी नोट

काराकस- आर्थिक परिस्थिती आणि गरिबी यामुळे त्रस्त  झालेल्या वेनेजुएला सरकारने तब्बल १० लाख रुपयांची चलनी नोट  बाजारात आणली आहे. बोलीवर हे वेनेजुएलाचे चलन असून डॉलरमध्ये या १० लाख बोलीवरच्या नोटीची किंमत फक्त अर्धा डॉलर म्हणजे ३५ रुपये आहे. भारतात एवढ्या किंमतीत अर्धा लिटर पेट्रोलही मिळत नाही.

तेलाच्या जोरावर कधीकाळी संपन्न असलेला वेनेजुएला सध्या अत्यंत दरिद्री झाला आहे. त्या देशात चलनाला काहीच किंमत राहिली नाही लोक पोतेभर पैसे घेऊन जात आहेत. आणि पिशवीभर सामान आणताना दिसत आहेत. वेनेजुएलाच्या केंद्रीय बँकेने दिलेल्या माहितीप्रमाणे आगामी आठवड्यात २ लाख आणि पाच लाख बोलीवरच्या नोटाही चलनात आणण्यात येणार आहेत.

सध्या वेनेजुएलामध्ये १००००, २०००० आणि ५०००० बोलीवरच्या नोटाही चलनात आहेत गेली आठ वर्षे सतत वेनेजुएलाला आर्थिक मंदीचा फटका बसत आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत वेनेजुएलाच्या अर्थव्यवस्थेचा आकार २० टक्के कमी होण्याचा अंदाज आहे. केवळ वेनेजुएलाचा विचार केला तर सध्या १० लाख बोलीवरच्या नोटमध्ये फक्त २ किलो बटाटे किंवा अर्धा किलो तांदूळ मिळू शकतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.