साताऱ्यातील युवतीची 10 लाखांची फसवणूक

सातारा – वधू परीक्षेच्या निमित्ताने घरगुती संबंध वाढवून साताऱ्यातील महिलेची तब्बल 9 लाख 95 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी विनय राजेश लोहिरे मंजुबा वस्ती पुणे याच्याविरूध्द सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अश्‍विनी प्रकाश जेधे वय 34 रा दिव्य नगरी सातारा यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस सूत्रांकडून आणि दाखल झालेल्या फिर्यादीनुसार लोहिरे याने फिर्यादीच्या भावाची लग्न ठरवण्याचे निमित्त करून ओळख काढली. वधू परीक्षेच्या निमित्ताने साताऱ्यात येऊन जेधे कुटुबियांशी जवळीक वाढवत वेगवेगळ्या प्रकारच्या चौकशा सुरू केल्या. दरम्यान काळात 6 ऑक्‍टो. 2018 रोजी फिर्यादीच्या भावाचा अपघाती मृत्यू झाला. त्याचे निमित्ताने लो हिरे याने पुन्हा तुझ्या भावाच्या मृत्यूच्या चौकशी प्रकरणी मुंबईला जात आहे असे सांगून अश्‍विनी यांच्याकडून दहा हजार रुपये उकळले.

ऑक्‍टो 2018 पासून लोहिरेने वेगवेगळ्या कारणांचे निमित्त पुढे करून तिच्याकडून दहा हजारापासून
टप्या टप्याने दोन ते चार लाखाच्या रकमा मनी ट्रान्सफरने स्वीकारल्या. गेल्या सहा महिन्यात जेधे यांचेकडून लोहिरे याने सातारा व पुणे येथे तब्बल नऊ लाख पंच्याण्णव हजार रुपये स्वीकारले. रक्कम देण्यास त्याने टाळाटाळ सुरू केल्यानंतर अश्‍विनी जेधे यांनी त्याच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.