महाबळेश्वर – महाबळेश्वर शहर व परिसरात पावसाची धुवॉंधार बॅटिंग सुरु असून या मुसळधार कोसळत असलेल्या पावसाने महाबळेश्वर शहर व परिसराला अक्षरश: गुरुवारी झोडपून काढले आहे.
या वर्षातला उचांकी असा 10.768 इंच पाऊस गुरुवारी सकाळी 8 वाजल्यापासून ते शुक्रवारी सकाळी 8 वा. पर्यंत 273.5 मि. मी. इतका पाऊस पडला आहे. वेण्णालेकच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून तलाव दुथडी भरून वाहत असून तिचे पाणी महाबळेश्वर- पाचगणी या मुख्य रस्त्यावरील हॉटेल सुमनराजच्या समोरील रस्त्यावर आल्याने वाहतूक मंदावली होती.
या भागातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र गुरुवारी दिवसभर होते. मुख्य बाजारपेठेत पर्यटकांची रेलचेल मंदावलेली दिसून येत असल्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता.