राजगुरूनगर : खेड तालुक्यात वाढता कोरोना विषाणू संसर्ग आणि बाधितांची ३६० वर गेलेली संख्या लक्षात घेता करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी खेड तालुक्यातील 3 नगरपरिषदा आणि १८ गावांमध्ये येत्या सोमवारपासून (दि १३) पुढे १० दिवस लॉकडाऊन लागु करण्यात आले आहे. अशी माहिती प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिली.
खेड तालुक्यात कोरोना बाधितांची आकडा ३६० वर पोहचला आहे तर, तालुक्यात 8 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. हि बाब नागरिकांसाठी गंभीर बनली आहे.
तालुक्यातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव यावर उपाययोजना आणि अधिकारी वर्गाचे प्रश्न जाणून घेण्यासाठी शनिवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजगुरूनगर येथील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रांताधिकारी तेली यांनी ही माहिती दिली.
या बैठकीला आमदार दिलीप मोहिते, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलताई पानसरे, पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, माजी सदस्य अरुण चांभारे, उपविभागीय पोलीस अधीक्षक गजानन टोम्पे, तहसीलदार सुचित्रा आमले, गटविकास अधिकारी अजय जोशी, वैद्यकीय अधीक्षक चाकण व चांडोली डॉ माधव कणकवले, चांडोली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ दीपक मुंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेश गोरे, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभागीय अधिकारी विलास भास्कर,एड सुखदेव पानसरे राजगुरूनगर, चाकण, आळंदीचे मुख्याधिकारी, आदी यावेळी उपस्थित होते.
प्रांत अधिकारी संजय तेली यांनी सांगितले कि, तालुक्यात करोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याने राजगुरूनगर, चाकण व आळंदी या 3 नगरपरिषदा आणि १८ गावे कंटेन्मेंट झोन करण्यात आली आहेत. येत्या १३ तारखेपासून ३ नगरपरिषदा व १९ गावांमध्ये १० दिवस कडक लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊन कंपन्या बंद होणार नाहीत. कंटेन्मेंट झोन किंवा लॉकडाऊन कालावधीत कामगारांना पास देण्यात येतील.
प स सभापती अंकुश राक्षे म्हणाले, कोव्हीड १९ बाधित रुग्ण चाचणी पैकी शासकीय लॅब मध्ये २५ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह येतात. खाजगी लॅब मध्ये हे प्रमाण ७५ टक्क्यांपर्यंत आहे. म्हाळुंगे कोव्हीड सेंटर मधून आता दररोज १०० स्वब तपासणी साठी पाठवले जात आहेत. तालुक्यात बाधित संख्या वाढू लागल्याने कडक लॉकडाऊन ची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे म्हणाल्या, आळंदी ग्रामीण रुग्णालयात अनेकदा भेट दिली. येथे सांगुन देखील उपचार पध्दतीत तत्परता आली नसल्याबद्दल या बैठकीत नाराजी व्यक्त केली. आरोग्य अधिकाऱयांनी तत्पर सेवा द्यावी. येथील आरोग्य अधिकारी डॉ जी जी जाधव यांना जिप अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्यासह आमदार मोहिते पाटील यांनी बैठकीत धारेवर धरले.
आमदार दिलीप मोहिते म्हणाले, तालुक्यातील वाढती संख्या असल्याने आळंदी,चाकण,चांडोली कोव्हीड सेंटर सुरू करण्यात येईल यासाठी कंपन्यांची मदत घेतली जाईल सीएसआर मधून निधी उपलब्ध करू. करोनावर मात करण्यासाठी खाजगी डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे.अधिकाऱ्याना काही अडचणी आणि मदत हवी असल्यास त्यांनी तत्काळ सांगावी नियोजन केले जाईल मात्र आता न सांगता नंतर काही बाबी सांगितल्यास त्यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील. नगरपरिषद हद्दीत उपचारासाठी कर्मचारी वर्ग कमी पडत आहे. या कामी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करणाऱ्या आशा वर्कर काम करीत असल्यास त्यांना दुप्पट मानधन देण्यासाठी मुख्याधिकारी यांनी तरतूद करावी.
यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या आमदार निधीतून करोना संसर्ग रोखण्यासाठी १० लाख रुपये किमतीचे वैद्यकीय साहित्याचे तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले.
या गावांमध्ये होणार लॉकडाऊन….
राजगुरूनगर, चाकण, आळंदी नगर परिषद,यांच्यासह मेदनकरवाडी, कडूस, पाईट, येलवाडी, निघोजे, नाणेकरवाडी, खराबवाडी, कडाचीवाडी, सोळू, वाकी खुर्द, दावडी, पिंपरी बुद्रुक, मरकळ, शेलपिंपळगाव, काळूस, सातकरस्थळ, चिंबळी, मोई,