लातूर ( प्रतिनिधी ) : लातूर जिल्ह्यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या कोरोना तपासणी अहवालानुसार लातूर शहरात १० कोरोना आढळून आले आहेत. त्यापैकी ९ पॉझिटिव्ह रुग्ण मोतीनरातील एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. तर एक पॉझिटिव्ह रुग्ण देसाई नगरमधील आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता सक्रीय पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६६ वर पोहचली आहे तर लातूर शहरातील कोरोना रुणांची संख्या २० वर पोहचली आहे. पैकी दोन रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत २९ मे रोजी एकुण ५० व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी ३८ व्यक्तींचे निगेटिव्ह, १० व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह तर २ व्यक्तीचे अहवाल अनिर्णित आलेले आहेत. १० पॉझिटिव्ह पैकी ९ व्यक्ती २८ मे रोजी मोती नगर लातूर येथे पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य आहेत व एक व्यक्ती देसाई नगर लातूर येथील असून ती व्यक्ती मुंबई वरून प्रवास करून आलेली आहे. त्या रुग्णास निमोनिया असून श्वास घेण्यास त्रास होत आहे. तसेच त्या रुग्णास सध्या विलगीकरन कक्षात दाखल करण्यात आले आहे. तर २ व्यक्तींचे अहवाल अनिर्णित आले आहेत.
उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण १६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी सर्वच १६ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे उदगीरकारांना आज दिलासा मिळाला आहे. चाकुर येथुन २ व्यक्तींचे स्वॅब तपासीसाठी आले होते, त्यापैकी दोन्ही व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. निलंगा येथील ४ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते, त्यापैकी सर्वच ४ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. स्त्री रुग्णालय, लातुर येथील ५ व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच ५ व्यक्तींचे निगेटीव्ह आले आहेत.