रत्नागिरीच्या समुद्रात 10 चीनी बोटी

तटरक्षक दलाकडून कार्यवाही सुरू

मुंबई – मुंबईसह किनारपट्टीला दहशतवाद्यांचा धोका असतानाच रत्नागिरीच्या समुद्रात 10 चिनी नौका आढळून आल्या आहेत. या बोटींची संबंधित तपास यंत्रणांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती पशू संवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत दिली.

रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ बंदरात विदेशी मच्छिमारांच्या 10 बोटी आढळून आल्याबाबत विधानसभेचे सदस्य सुभाष पाटील यांनी लक्षवेधी मांडली होती. त्याला उत्तर देताना महादेव जानकर यांनी ही माहिती दिली. जानकर म्हणाले, चिनी 10 नौकांपैकी 4 नौका या दाभोळ येथे बंदर खात्याच्या अखत्यारित आहेत. उर्वरित 6 नौका या तटरक्षक दल या विभागाच्या अखत्यारित आहेत. याबाबत जिल्हाधिकारी, यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस विभाग, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, तटरक्षक दल, मत्स्यव्यवसाय विभाग, कस्टम विभाग, सागरी पोलीस इत्यादींनी चौकशी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, स्थानिक मच्छिमारांच्या सुरक्षेच्या आणि व्यवसायाच्या अनुषंगाने मत्सव्यवसायाबाबत पुढील 15 दिवसात धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती जानकर यांनी यावेळी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.