मुंबईत सुरू होणार 10 चार्जिंग स्टेशन्स

मुंबई  – मुंबईत इलेक्‍ट्रिक स्कूटरची अधिकृतपणे डिलीव्हरी सुरु केली आहे. त्यानंतर आता ऍथर एनर्जीकडून मुंबईत फास्ट चार्जिंग पब्लिक नेटवर्कची सुरूवात करण्यात आली आहे. कंपनीने आता ऍथर ग्रीडची मुंबईत सुरूवात केली आहे. मुंबईतील 10 विविध अशा हॉट स्पॉट्‌स वर म्हणजेच लिंकिंग रोड, गोरेगाव, अंधेरी, फोर्ट इत्यादी ठिकाणी ही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

पुढील वर्षी ऍथर एनर्जीकडून मुंबईतील विविध ठिकाणी 30 फास्ट चार्जिंग पॉईंट्‌स सुरु करण्यात येणार आहेत. या करता ऍथर एनर्जीने पार्क  बरोबर भागीदारी केली असून त्यांच्याकडून मुंबईत इव्ही लोकेशन्स सुरु करण्यात येणार आहेत.

ऍथर एनर्जीकडून भारतातील 18 शहरांमध्ये 128 पब्लिक चार्जिंग पॉईंट्‌सची सुरुवात केली आहे. फास्ट चार्जिंग नेटवर्क चा उपयोग हा भारतातील सर्व इलेक्‍ट्रिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांकडून केला जाऊ शकतो आणि त्याच बरोबर या सुविधांचा वापर ते अगदी मोफत करू शकतील. या चार्जिंग नेटवर्कवर नियंत्रण हे ऍथर ग्रीड ऍपच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.