सातारा – लंपी स्किनच्या प्रादुर्भावामुळे शनिवारअखेर जिल्ह्यात 52 जनावरांचा मृत्यू झाला असून शनिवारी एका दिवसात दहा जनावरांचा मृत्यू झाला.
78 गावांमधील 670 जनावरे बाधित असून 82 जनावरे नियमित औषधोपचाराने बरी झाली आहेत. जिल्ह्यात दोन लाख 3 हजार 4 जनावरांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली.
लंपी स्किनचा प्रादुर्भाव महाबळेश्वर तालुका वगळता इतर सर्व तालुक्यांत झाला आहे. 535 जनावरांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात 2 लाख 81 हजार 900 एवढ्या लसमात्रा उपलब्ध आहेत.