नवी दिल्ली – फेसबुकच्या मालकिचं असलेल्या इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हाट्सअॅवर दररोज एक हजार कोटींहून अधिक मेसेज पाठवले जातात. या संदर्भात फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांनी माहिती दिली आहे. तसेच दररोज 250 कोटीहून अधिक लोक व्हाट्सअप आणि फेसबुकचे इतर अॅप्स वापरतात, असेही मार्कने सांगितले आहे.
500 कोटी पेक्षा जास्त वेळा केले डाउनलोड-
एका अहवालानुसार, ऑक्टोबरपर्यंत व्हाट्सअॅपवर 200 कोटी अॅक्टिव्ह यूजर्स होते. जानेवारीमध्ये अॅंड्राॅइड डिव्हाइसवर व्हाट्स्ॅप हे 500 कोटीहून अधिक वेळा डाउनलोड केले आहे. तसेच फेसबुक मेसेंजर वर 130 कोटी युजर्स अॅक्टिव्ह होते.
मेसेंजर आणि इंस्टाग्रामला केले एकत्र-
कंपनीने नवीन अपडेट्सनुसार मेसेंजर आणि इंस्टाग्राम यांना एकत्रित केले आहे. युजर्सना हे एकत्रिकरण खूप आवडले आहे. युजर्सकडून पाॅझिटिव्ह फिडबॅक मिळाला आहे. मागिल काही दिवसांत नवनविन फिचर्स अॅड केले आहे. तसेच व्हाट्सअॅपवर म्युट अलवेज चा पर्याय देण्यात आला आहे, असे मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले आहे.