नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आज 1 हजार 347 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 91 हजार 48 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 89.57 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्ह्यात आज 1 हजार 617 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या 9 हजार 368 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 458, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 619 आणि अँटिजेन चाचणीत 540 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 285, अकोले 11, कर्जत 2, कोपरगाव 1, नगर ग्रामीण 31, नेवासे 3, पारनेर 16, पाथर्डी 3, राहता 26, राहुरी 8, संगमनेर 4, शेवगाव 5, श्रीरामपूर 28, कॅन्टोन्मेंट बोर्ड 35, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 141, अकोले 22, जामखेड 5, कर्जत 3, कोपरगाव 62, नगर ग्रामीण 17, नेवासे 15, पारनेर 7, पाथर्डी 4, राहाता 127, राहुरी 27, संगमनेर 94, शेवगाव 4, श्रीगोंदा 12, श्रीरामपूर 53, कॅन्टोन्मेंट बोर्ड 6, इतर जिल्हा 19 आणि इतर राज्य 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत आज 540 जण बाधित आढळून आले. मनपा 65, अकोले 6, जामखेड 3, कर्जत 92, कोपरगाव 14, नगर ग्रामीण 50, नेवासे 33, पारनेर 8, पाथर्डी 45, राहाता 37, राहुरी 91, शेवगाव 18, श्रीगोंदा 33, श्रीरामपूर 24, कॅन्टोन्मेंट बोर्ड 20 आणि इतर जिल्हा 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 453, अकोले 21, जामखेड 60, कर्जत 7, कोपरगाव 102, नगर ग्रामीण 68, नेवासे 18, पारनेर 26, पाथर्डी 92, राहाता 116, राहुरी 49, संगमनेर 90, शेवगाव 66, श्रीगोंदा 60, श्रीरामपूर 75, कॅन्टोन्मेंट 26, मिलिटरी हॉस्पिटल 3 आणि इतर जिल्हा 15, अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्णसंख्या:91048
उपचार सुरू असलेले रुग्ण:9368
मृत्यू:1238
एकूण रुग्णसंख्या:1,01,654