प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला काही नियम किंवा काही गोष्टी बदलत असतात. नवीन गोष्ट लागू करण्यासाठी शक्यतो नवीन महिन्याची 1 तारीख निवडली जाते. उद्यापासून सप्टेंबर महिना सुरु होत असल्याने काही नियमांत बदल करण्यात आला आहे. या नियमांमुळे तुमच्यावर आर्थिक बोजा पडू शकतो. आधार कार्ड, क्रेडिट कार्ड, एलपीजी सिलेंडर किंवा एफडी असो. प्रत्येकाचे नियम बदलणार आहेत. ज्याचा परिणाम थेट तुमच्यावर होणार आहे. तर कोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहे हे थोडक्यात जाणून घेऊयात…
1- एलपीजी सिलेंडरच्या किमतीत होणार बदल
एलपीजी सिलिंडरच्या दरात दर महिन्याला बदल होत असतात. कधी तेल कंपन्या किंमत वाढवतात तर कधी कमी करतात. अशा परिस्थितीत यावेळीही एलपीजीच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे.
2- बनावट कॉलशी संबंधित नियम
उद्यापासून फेक कॉल्स आणि मेसेजवर नियंत्रण ठेवता येणार आहे. यासाठी ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना असे कॉल्स आणि फेक मेसेजेसवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ट्रायने याबाबत कठोर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. TRAI ने Jio, Airtel, Vodafone, Idea, BSNL यांसारख्या दूरसंचार कंपन्यांना 30 सप्टेंबरपर्यंत टेलिमार्केटिंग कॉल्स आणि 140 मोबाइल नंबर सीरिजपासून सुरू होणारे व्यावसायिक मेसेजिंग ब्लॉकचेन आधारित DLT म्हणजेच डिस्ट्रिब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मवर शिफ्ट करण्यास सांगितले आहे.
3- ATF आणि CNG-PNG चे दर बदलणार
एलपीजी सिलिंडरबरोबरच, हवाई इंधन म्हणजेच एअर टर्बाइन इंधन (एटीएफ) आणि सीएनजी-पीएनजीच्या किमतींमध्येदेखील बदल होणार आहे.
4- क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल
HDFC बँकेने युटिलिटी व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्सची मर्यादा निश्चित केली आहे, हा नियम 1 सप्टेंबरपासून म्हणजेच उद्यापासून लागू होईल. या अंतर्गत, ग्राहकांना या व्यवहारांवर दरमहा केवळ 2,000 पॉइंट मिळू शकतात. थर्ड पार्टी ॲपद्वारे पेमेंट केल्यास HDFC बँक कोणतेही बक्षीस देणार नाही. याशिवाय, 1 सप्टेंबर 2024 पासून, UPI आणि इतर प्लॅटफॉर्मवर पेमेंटसाठी RuPay क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना इतर पेमेंट सेवा प्रदात्यांचे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांप्रमाणेच रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील.
5- महागाई भत्त्यात वाढ होणार
केंद्र सरकार सप्टेंबरमध्ये कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करू शकते. सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करू शकते. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 50 टक्के महागाई भत्ता (DA) दिला जात आहे, तर 3 टक्क्यांच्या वाढीनंतर तो 53 टक्के दिला जाऊ शकतो.
6- मोफत आधार अपडेट
मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम तारीख १४ सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. यानंतर, तुम्हाला आधारशी संबंधित काही गोष्टी अपडेट करायच्या असतील तर त्यासाठी शुल्क द्यावे लागणार आहे.
7- विशेष FD मध्ये गुंतवणुकीशी संबंधित नियम
IDBI बँकेने 300 दिवस, 375 दिवस आणि 444 दिवसांच्या विशेष एफडीची मुदत 30 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. इंडियन बँकेने 300 दिवसांच्या विशेष एफडीची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. तर पंजाब आणि सिंध बँकेच्या विशेष एफडीची अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे. एसबीआय अमृत कलश स्पेशल एफडी योजनेची अंतिम मुदतही ३० सप्टेंबर ठेवण्यात आली आहे. म्हणजेच सप्टेंबरनंतर या एफडी योजनांमध्ये कोणतीही गुंतवणूक होणार नाही.