वाघोली – वाघोली मधील वाघेश्वर देवस्थान अंतर्गत वाघोली विकास प्रतिष्ठान तर्फे अयोध्येतील श्री राम मंदिरासाठी एक लाख रुपयाचा धनादेश राम मंदिर न्यासाचे कार्यकर्ते वाघोली गावचे सामाजिक कार्यकर्ते कृष्णकांत सातव पाटील यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी वाघोली विकास प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजेंद्र अण्णा सातव पाटील, उपाध्यक्ष रामभाऊ दत्तात्रय दाभाडे, पंढरीनाथ नाना कटके, शिवदास उबाळे, बाळासाहेब बापूसाहेब सातव पाटील, वसंत काका जाधवराव, डॉ. स्मिता चंद्रकांत कोलते, बाळासाहेब जगताप दत्तात्रय कटके, सर्जेराव वाघमारे, सुनिल तुकाराम कावडे, वंदना संदीप थोरात, प्रियांका रवी काळे, नवनाथ सातव
वाघेश्वर मंदिराचे गुरव रवींद्र काळे, अतुल शिंदे मान्यवर उपस्थित होते.