नवी दिल्ली – करोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढत असून करोनाग्रस्तांच्या उपचाराच्या निधीसाठी अनेक बॉलिवूड, खेळाडू, राजकीय नेतेही मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. यामध्ये आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही खासदार निधीतून १ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. तसेच महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ महिन्यांचे वेतनही दिले आहे.
राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती महामहिम वैंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार कोरोनाच्या लढ्याला मदत करण्यासाठी पीएम केयर फंडात माझ्या खासदार निधीतून 1 कोटी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री फंडात माझ्या दोन महिन्याचे वेतन देण्याचा आज निर्णय घेतला.
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) March 29, 2020
करोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केली आहे. तसेच कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी मोदींनी PM-CARES फंडची निर्मिती केली आहे. या माध्यमातून मोदींनी देशातील जनतेला मदतीचे आवाहन केले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनतेला मुख्यमंत्री सहायता निधीत मदत करण्याचे आवाहन केल आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत रामदास आठवले यांनी खासदार निधीतून १ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. तसेच महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ महिन्यांचे वेतनही दिले आहे. तसेच, रामदास आठवले यांच्या संविधान या बंगल्यावर गरजूंसाठी १४ एप्रिलपर्यंत मोफत जेवण्यात देण्यात येत आहे. आठवले यांनी आज सकाळी संविधान बंगल्यावर गरजूंना मोफत जेवण देऊ केले.
हातावर पोट असणाऱ्या मजुरांना;गरजूंना आज पासून 14 एप्रिल पर्यंत संविधान निवासस्थानी मोफत भोजन वाटप सुरू केले. pic.twitter.com/3wvmXpt3s7
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) March 30, 2020
दरम्यान, करोनाविरोधात रामदास आठवले यांनी घोषणा दिल्या होत्या. ‘गो करोना… गो… गो करोना… गो’ अशा घोषणा होत्या तर आता आठवले यांनी सर्वांना सरकारच्या निर्देशाचं पालन. तसंच योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, या घोषणेवरून आठवलेंना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते.