सासवड, (प्रतिनिधी ) – पुरंदर तालुक्यातील सासवड येथील अजित नागरी सहकारी पतसंस्थेचा 1 कोटी 11 लाख 19 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे, अशी महिती पुरंदर-हवेलीचे माजी आमदार तथा पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक टेकवडे यांनी दिली.
पुरंदर-हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी स्थापन केलेली सासवड येथील अजित नागरी सहकारी पतसंस्थेची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. 8) अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात येथील सासवड येथील अजित नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात येथे संस्थेच्ये अध्यक्ष अशोक टेकवडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि रिलायन्स उद्योग समूहाचे पाच राज्यांचे हेड नितीन घोरपडे यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली. तर सभेच्या सुरुवातीला श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन करूण दीपप्रज्वलन झाले.
अशोक टेकवडे म्हणाले की, अजित नागरी सहकारी पतसंस्थेचा सहकारी बँकेप्रमाणे कामकाज चालू असल्याचे संचालक मंडळाने व्यवस्थापनावर टाकलेल्या विश्वासामुळे कर्ज वितरण व्यवस्थित पणे केले जाते सभासदांचा असलेला संचालक मंडळ वर विश्वास यामुळे संस्था पुढे जात आहे पतसंस्थेच्या वतीने बँक गॅरंटी देण्याची योजना देखील सुरू करण्यात आली आहे. माजी आमदार अशोक टेकवडे यांनी सांगितले.
आर्थिक स्थिती :
31 मार्च 2024 अखेर ठेवी : 86 कोटी 17 लाख रुपये
भागभांडवल : 6 कोटींचे 16 लाख 56 हजार रुपये
राखीव निधी व इतर निधी : 17 कोटी 60 लाख 36 हजार रुपये
गुंतवणूक : 30 कोटी 40 लाखांची 96 हजार
कर्ज वाटप : 81 कोटी 10 लाख 95 हजार रुपये
सतत ऑडिट वर्ग : अ
यंदा सभासदांना लाभांश : 10 टक्के
संस्थेच्या शाखा : 8 शाखा