आषाढी एकादशीनिमित्त एसटीला 1 कोटीचे उत्पन्न

आगार निहाय उत्पन्न

तारकपूर- 38 बसेसच 22 लाख 41 हजार 306, शेवगाव-15 बसेसस 8 लाख 37 हजार 894, जामखेड 29 बस 6 लाख 69 हजार 630, श्रीरामपूर-10 बस 6 लाख 11 हजार 934, कोपरगाव-23 बसेस 9 लाख 5 हजार 338, पारनेर-30 बस 9 लाख 52 हजार 248, संगमनेर-13 बस 8 लाख 74 हजार 691, श्रीगोंदा-22 बस 7 लाख 31 हजार 608, नेवासा-22 बस 9 लाख 61 हजार 70, पाथर्डी-12 बस 6 लाख 35 हजार 311, अकोले- 12 बस 3 लाख 40 हजार 656 असा एकून 97 लाख 61 हजार 756 उत्पन्न परिवहन मंडळाला मिळाले आहे.

नगर – आषाढी एकादशीनिमित्त राज्य परिवहन महामंडळाकडून पंढरपूर यात्रेसाठी जिल्ह्यातून 226 बसेसे सोडण्यात आल्या होत्या. या बसेसच्या माध्यमातून 97 लाख 61 हजार 756 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामुळे एसटी महामंडळाला विठोबा पावला आहे.
आषाढी एकादशी ही शुक्रवारी (दि.12) जुलै होती.

परिवहन मंडळाच्या वतीने 8 जुलै रोजी पासूनच मागणीनुसार पंढरपुरसाठी बसेस सोडण्यात आल्या होत्या. ह्या बसेस 17 जुलै पर्यंत सोडण्यात आल्या. विठ्ठलाच्या दर्शनासाठी जिल्ह्याभरातून भाविक पंढरपुरात जात असल्याने पूर्ण यात्राचे नियोजन हे तारकपूर बसस्थानकातून करण्यात आले होते. नगर जिल्ह्यातून 226 बसेस सोडण्यात आल्या होत्या. याबसेसने तब्बल 2 लाख 98 हजार 371 किलोमीटर प्रवास करत 226 बसेसच्या 1 हजार 388 फेऱ्या केल्या.

त्यामधून मिळालेले उत्पना हे 97 लाख 61 हजार 756 रुपये उत्पन्न मिळाले आहे. त्यापैकी सर्वाधिक उत्पन्न हे तारकपूर बस स्थानक अव्वल असून 22 लाख 41 हजार 306 रुपये मिळाले आहे. पंढरपुरला जाण्यासाठी भाविकांना आपले तिकीट आरक्षित करण्यासाठी आरक्षण सुविधादेखील सुरू करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)