महापौरांच्या प्रभागात दिवाबत्तीसाठी 1 कोटीचा खर्च 

पिंपरी – पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांच्या प्रभागातील रस्त्यांवरील दिवाबत्तीचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक दोन जाधववाडी, चिखली गावठाणातील दिवाबत्तीच्या नूतनीकरणासाठी एक कोटी 4 लाख 84 हजार रुपयांचा खर्च येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने बुधवारी(दि.17) ऐनवेळी मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या विद्युत विभागाच्या वतीने शहरातील दिवाबत्तीची कामे केली जातात. महापौर राहुल जाधव यांच्या प्रभाग क्रमांक दोनमधील रस्त्यांवरील दिवाबत्तीचे नूतनीकरण केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. तीन ठेकेदारांनी निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला होता. राधा इलक्‍ट्रिकल्स, यश इलक्‍ट्रिकल्स आणि सुमी इलक्‍ट्रिकल सर्व्हिसेस या तिघांच्या निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी राधा इलक्‍ट्रिकल्स या ठेकेदाराची निविदा रकमेच्या 21.7 टक्के कमी दराची होती.

ही निविदा तुलनात्मकदृष्ट्‌या वाजवी दराची आहे. तसेच ठेकेदार मुदतीमध्ये काम करण्यास सक्षम असल्याने अतिरिक्‍त आयुक्त संतोष पाटील यांनी 10 जुलै 2019 रोजी निविदा स्वीकारण्यास मान्यता दिली. त्यानुसार राधा इलेक्‍ट्रीकल्स या ठेकेदाराकडून एक कोटी चार लाख 84 हजार 269 रुपयांमध्ये दिवाबत्तीची नूतनीकरणाची कामे करुन घेतली जाणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने ऐनवेळी मान्यता दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)