कोल्हापूर (प्रतिनिधी) – कोल्हापुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आजच साडेचार हजार पॉझिटिव्ह रुग्णांचा टप्पा कोल्हापूर जिल्ह्याने पार केला आहे. त्यामुळे कोल्हापुरातील सरकारी रुग्णालय हाऊसफुल झाली आहेत.
गेल्या चार दिवसात रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड न मिळाल्यामुळे आणि उपचार न झाल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली होती. ही बाब गंभीर असल्याने राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि कोल्हापूरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाला एक कोटी रुपयांचे बेड आणि व्हेंटिलेटर साहित्य आज देण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी सीपीआर हॉस्पिटलला एक कोटी रुपयांच्या साहित्य आज प्रदान केल आहे. या साहित्यामुळे कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटलला मोठी मदत होणार आहे.