आंबेगाव-शिरूरसाठी 1 कोटी 43 लाखांचा निधी

मंचर- ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या प्रयत्नातून व राज्याच्या ग्रामीण विकास विभागाच्या माध्यमातून आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघातील विकासकामांसाठी 1 कोटी 43 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती शिवसेनेचे आंबेगाव तालुकाप्रमुख अरुण गिरे यांनी दिली.

अरुण गिरे यांनी सांगितले की, आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सातत्याने पत्रव्यवहार करुन व मंत्रालयीन पातळीवर ग्रामीण विकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार निधी मंजूर झाला आहे.
आंबेगाव तालुक्‍यातील मंजूर कामे पुढीलप्रमाणे – लांडेवाडी येथे व्यासपीठ बांधणे, जारकरवाडी गावठाण येथे स्मशानभूमी संरक्षक भिंत बांधणे, नारोडी येथे सभामंडप बांधणे, अवसरी बुद्रुक येथील वरचा हिंगेमळा येथे पेव्हींग ब्लॉक बसविणे, टाव्हरेवाडी ते काळकाई रस्ता दुरुस्ती, टाकेवाडी येथील ग्रामपंचायत ते दरेकरवस्ती पर्यंतचा रस्ता दुरुस्ती, चिंचोडी (देशपांडे) येथे दशक्रिया घाट परिसर सुधारणा, तळेकरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत रस्ता दुरुस्ती, लांडेवाडी पिंगळवाडी येथे व्यायामशाळा बांधणे, कोलदरे येथे व्यायामशाळा बांधणे, लौकी जिल्हा परिषद शाळालगत संरक्षण भिंत बांधणे, वडगाव पीर येथे सभामंडप बांधणे आदी कामांचा समावेश आहे.

शिरुर तालुक्‍यातील मंजूर कामे – धामारी येथील कान्हुर मेसाई ते कापरेवस्ती रस्ता दुरुस्ती, धामारी येथील डफळापूर येथे व्यायामशाळा बांधणे, कवठे येमाई येथील शिरुर-मंचर ते कवठे येमाई रस्ता दुरुस्ती, सविंदणे येथील लंघेमळा-मडकेवस्ती-शीव रस्ता दुरुस्ती, आमदाबाद येथील आमदाबाद फाटा ते टाकळीहाजी ते पवारवस्ती रस्ता दुरुस्ती, मलठण येथील कान्हुर ते कोठावळेवस्ती रस्ता दुरुस्ती, जातेगाव खुर्द गावठाण अंतर्गत रस्ता दुरुस्ती, मुखई ते डफळवस्ती रस्ता दुरुस्ती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)