सिमी व्हॅली – अमेरिकेने युक्रेनला १ अब्ज डॉलर किंतीच्या दीर्घकालीन शस्त्रास्त्रांची मदत देऊ केली आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉइड ऑस्टिन यांनी शनिवारी ही माहीती दिली. नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता ताब्यात घेण्यापूर्वी ही मदत उपलब्ध करून देण्यासाठी बायडेन प्रशासनाने त्वरेने संसदेची मंजूरी मिळवली असल्याचे त्यांनीसांगितले.
दीर्घकाळासाठी शस्त्रास्त्रांची प्रणाली कंत्राटी तत्वावर युक्रेनला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. खरेदी केलेल्या शस्त्रास्त्र प्रणालींचा हेतू युक्रेनच्या भविष्यातील लष्करी क्षमतांना समर्थन देण्यासाठी आहे. मात्र त्यामुळे प्रत्यक्ष युद्धभूमीवर विशेष फरक पडणार नाही.
अमेरिकेने युक्रेनला आतापर्यंत ७२५ दशलक्ष डॉलर किंमतीच्या लष्करी सामुग्रीची मदत केली आहे. आता देऊ केलेले १ अब्ज डॉलर किंमतीच्या शस्त्र प्रणालीचे पॅकेज हे पूर्वीच्या मदतीच्या व्यतिरिक्त असणार आहे. रशियाने आता युक्रेनविरोधात उत्तर कोरियाच्या सैन्यालाही युद्धभूमीवर उतरवले आहे.