सातारा (प्रतिनिधी) – सातारा-जावळी मतदारसंघात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विकासकामांचा धडाका सुरू ठेवला आहे. जिल्हा परिषदेच्या विशेष अनुदान योजनेतून सातारा तालुक्यात 28 व जावळी तालुक्यात 19 विकासकामांसाठी एक कोटी 77 लाख, तर मोठ्या सहा ग्रामपंचायतींसाठी 19 लाख रुपये निधी मंजूर करून घेतला आहे. “क’ वर्ग यात्रास्थळ विकास कार्यक्रमांतर्गत सहा कामांसाठी 26 लाख 50 हजार रुपये निधी मंजूर करून घेतला आहे.
सातारा तालुक्यात म्हसवे येथे बंदिस्त गटार तीन लाख, वेचले, धनवडेवाडी, आरे तर्फ परळी, जुंगटी, खडगाव, आलवडी, पाटेघर-जळकेवाडी, अंबवडे बुद्रुक येथे स्मशानभूमी शेडसाठी प्रत्येकी चार लाख, वर्ये अंतर्गत रस्ता डांबरीकरण तीन लाख, केळवली, भाटमरळी ग्रामपंचायत कार्यालयासाठी प्रत्येकी दहा लाख, मालदेव व नावली स्मशानभूमी शेडसाठी प्रत्येकी तीन लाख, सोनवडी रस्ता कॉंक्रिटीकरण तीन लाख, राजापुरी अंतर्गत रस्ता डांबरीकरण चार लाख,
आरे अंतर्गत रस्ता सहा लाख, कोंडवे येथे मुगुट पवार घर ते दत्तात्रय गाडे घर व विघ्नहर्ता कॉलनीत बंदिस्त गटार प्रत्येकी तीन लाख, सैदापुरात बंदिस्त गटार तीन लाख, वेळे रस्ता कॉंक्रिटीकरण पाच लाख, कण्हेर स्मशानभूमी रस्त्यासाठी तीन लाख, आगुंडेवाडी रस्ता कॉंक्रिटीकरण तीन लाख, जांभळेवाडीत रस्ता तीन लाख, दहिवड स्मशानभूमी शेडसाठी पाच लाख, धावडशी अंतर्गत रस्ता व गटारासाठी तीन लाख, जकातवाडीत मराठी शाळेजवळ रस्ता डांबरीकरण चार लाख व गटारासाठी तीन लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
जावळी तालुक्यात पवारवाडी, भणंग, नांदगणे, पुनवडी, भामघर, भिवडी, केळघर, बाहुले येथे स्मशानभूमी रस्त्यांसाठी प्रत्येकी तीन लाख, सनपाने येथे स्मशानभूमीच्या रस्त्यासाठी चार लाख, सोनगाव येथे गटारासाठी चार लाख, पुनवडी ग्रामपंचायत कार्यालयासाठी दहा लाख, फळणी स्मशानभूमी शेड व रस्त्यासाठी चार लाख, ओझरे ग्रामपंचायत कार्यालय वाढीव इमारतीसाठी दोन लाख, काटवली स्मशानभूमी शेड व रस्ता सहा लाख, विवर, भालेघर, बेलोशी स्मशानभूमी दुरुस्ती व सुशोभिकरण प्रत्येकी तीन लाख, दुदुस्करवाडी ग्रामपंचायत इमारत दहा लाख, असा निधी मंजूर झाला आहे.
नागरी सुविधेसाठी विशेष अनुदान योजनेतून साताऱ्यातील लिंब येथे गांधी चौकात पेव्हर ब्लॉक व सुशोभिकरण तीन लाख, रामेश्वर मंदिर रस्ता तीन लाख, शेरी, किरमाडे मळा अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करण्यासाठी प्रत्येकी तीन लाख, जावळी तालुक्यात कुडाळ येथे अंतर्गत रस्ता चार लाख, सावता माळी चौक-पानस रस्त्यासाठी तीन लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
“क’ वर्ग यात्रास्थळ विकास योजनेतून सातारा तालुक्यात कुरुळबाजी येथे घाटाईदेवी मंदिर भक्तनिवासासाठी आठ लाख, परिसरात कॉंक्रिटीकरणासाठी तीन लाख, हायमास्ट दिवे दीड लाख, जावळी तालुक्यात मेरुलिंग-नरफदेव रस्त्यासाठी पाच लाख, करहर येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर सुधारणा चार लाख आणि कुसुंबी येथे काळेश्वर मंदिर संरक्षक भिंत व रस्त्यासाठी पाच लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.