भारतात दररोज 1.1 लाख नमुन्यांची चाचणी

नवी दिल्ली – भारताने आपली चाचणी क्षमता लक्षणीयरीत्या वाढविली असून आता भारत आता दररोज अंदाजे 1.1 लाख नमुन्यांची चाचणी करीत आहे. प्रयोगशाळा, सुधारणा, आरटी-पीसीआर मशीन (वास्तविक वेळ -पॉलिमर चेन रिअक्‍शन मशीन) आणि मनुष्यबळ वाढवून ही क्षमता वाढविण्यात आली आहे. कोविड -19 बाधित रुग्णांची संख्या तपासण्यासाठी आजमितीस देशात एकूण 612 प्रयोगशाळा आहेत. त्यातील आयसीएमआरद्वारे 430 तर खाजगी क्षेत्राद्वारे 182 प्रयोगशाळा चालविल्या जातात.

देशात रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने सुधारत आहे आणि सध्या तो 41.61% आहे. कोविड-19 आजारातून आतापर्यंत एकूण 60,490 रुग्ण बरे झाले आहेत. देशात या आजारामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या प्रमाणातही 3.30% (15 एप्रिल रोजी) वरून सध्याच्या 2.87% घट होताना दिसून येत आहे. हे प्रमाण जागतिक स्तरावर कमीत कमी आहे.

या आजाराने मृत्यू होणाऱ्यांची जागतिक सरासरी सध्या 6.45% च्या आसपास आहे. दर लाख लोकसंख्येच्यामागे या आजाराने मृत्यू होण्याच्या आकडेवारीच्या विश्‍लेषणावरून असे दिसून येते की जगात प्रत्येक लाख लोकसंख्येमागे 4.4 मृत्यूचे प्रमाण आहे तर भारतात जगाच्या तुलनेत ते कमी म्हणजे 0.3 प्रति लाख आहे. दर लाख लोकसंख्येच्यामागे असलेले मृत्यूचे प्रमाण आणि मृत्यू दर याची तुलनेने कमी असलेली आकडेवारी ही वेळेवर रुग्ण चिकित्सा करून त्यांचे नैदानिक व्यवस्थापन दर्शविते.

टाळेबंदीचे निर्बंध शिथिल केल्यानंतर आणि आंतरराज्यीय स्थलांतर करण्यास परवानगी मिळाल्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यात गेल्या तीन आठवड्यांपासून कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.