पुणे – पुण्यातील एनआयबीएम परिसरातील कोरिएंथन क्लब जवळ साकारणाऱ्या “अवनी’ या प्रकल्पामध्ये दिवाळीत घर बुक करणाऱ्यांना मोठा फायदा मिळणार आहे. निसर्गरम्य परिसर लाभलेल्या प्राईम लोकेशनवर हा सेमी फर्निश्ड् घरांचा प्रकल्प आहे.
प्रत्येक घरामध्ये एसी व किचन ट्रॉली असलेल्या या घरांची किंमतही सर्वसामान्यांना परवडणारी आहे. “अवनी’मध्ये 1 बीएचके 28.20 लाख तर 2 बीएचके 41.60 लाख या किंमतीमध्ये उपलब्ध आहेत. दिवाळीच्या काळात फ्लॅट बुक करणाऱ्यांना 0% खर्चाची योजना जाहीर करण्यात आलेली आहे. या योजनेनुसार घरासाठी लागणारी स्टॅम्प ड्युटी, जीएसटी व रजिस्ट्रेशन चार्जेसमध्ये 100% सूट देण्यात आलेली आहे.
हा प्रकल्प रेरा नोंदणीकृत असून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पात्र ग्राहकांना रू. 2.67 लाखांची सवलत मिळू शकणार आहे. त्यामुळे हे सेमी फर्निश्ड् घर घेतानाही तुमची पैशांची मोठी बचत होणार आहे. या प्रकल्पामध्ये क्लब हाऊस, जिम्नॅशियम, किड्स प्ले एरिया, ओपन लॉन, क्रिकेट प्रॅक्टिस पीच, सीनिअर सिटीझन एरिया, बास्केट बॉल कोर्ट, व्हॉलीबॉल कोर्ट या व अशा आधुनिक मेनिटीज् देण्यात आलेल्या आहेत. फक्त रू. 25 हजार भरून या घराचे बुकिंग करता येणार आहे.