सलग चौथ्या महिन्यांत कर्ज केले स्वस्त
पुणे :- बॅंक ऑफ महाराष्ट्रने (बीओएम) आपल्या निधी आधारित कर्ज (एमसीएलआर) व्याजदरामध्ये सलग चौथ्या महिन्यांत कपात केली आहे. त्यामुळे ह कर्ज आणखी स्वस्त झाले आहे.
आता निधी आधारित कर्ज व्याजदर (एमसीएलआर) 7 जुलै 2020 पासून प्रचलित दरापेक्षा 0.20 टक्क्यानी ( 20 बेसीस पॉईंटनी) कमी करण्यात आला आहे.
बॅंकेचा ओव्हरनाईट, एक महिन्याचा निधी आधारित कर्ज व्याजदर (एमसीएलआर) अनुक्रमे 7.00% (पूर्वीचा 7.20%) आणि 7.10% (पूर्वीचा 7.30%) असेल. तर तीन महिने आणि सहा महिन्यांचा निधी आधारित कर्ज व्याजदर (एमसीएलआर) 7.20% (पूर्वीचा 7.40%) आणि 7.30% (पूर्वीचा 7.50%) करण्यात आला आहे. एक वर्षाचा निधी आधारित कर्ज व्याजदर (एमसीएलआर) 7.50% (पूर्वीचा 7.70%) झाला आहे. बॅंकेचे एमसीएलआरमधील कपात करण्याचे उद्दिष्ट आर्थिक विकासास आणि औद्योगिक विकासास समर्थन देणे हे आहे.