मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाशी संबंधित अंमली पदार्थ रॅकेटची चौकशी एनसीबी अर्थात अंमली पदार्थविरोधी पथकातर्फे सुरु आहे.
चौकशीदरम्यान एनसीबीच्या हाती ड्रग्ज रॅकेटमध्ये आणखी काही बॉलिवूडकर सामील असल्याबाबतचे पुरावे लागले आहेत. बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात नाव आलेल्या अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रित सिंह आणि श्रद्धा कपूर या एनसीबीसमोर हजर होणार आहे.
दरम्यान, एनसीबीने रकुल प्रीत सिंहला समन्स बजावला होता. मात्र, सुरुवातीला तिने समन्स मिळालाच नसल्याचा बहाणा देत टाळाटाळ केली. त्यानंतर तिने अखेर एनसीबीचे समन्स स्वीकारले आणि आज तिची चौकशीही केली जाणार आहे. सकाळी 11 वाजता एनसीबी तिची चौकशी करणार आहे. तर अभिनेत्री दीपिका पदुकोणची आज दुपारी चौकशी होणार आहे.
Mumbai: Karishma Prakash, actor Deepika Padukone’s manager, arrives at NCB SIT office. She was summoned by Narcotics Control Bureau to join the investigation of a drug case, related to #SushantSinghRajputDeathCase. pic.twitter.com/hUvj5JfkA9
— ANI (@ANI) September 25, 2020