पुणे : रूग्णवाहीकेला गर्दीतून वाट करून देण्यासाठी स्थापन झालेल्या हेल्प रायडर्स या संस्थेकडून सामाजिक भान जपत महाड मधील पूरग्रस्तांसाठी पहिल्या टप्प्यात 600 कुटूंबांसाठी जीवनावश्यक वस्तू तसेच पाण्याचे बॉक्सची मदत करण्यात आली.संस्थेच्या 35 सदस्यांनी पूरग्रस्त भागात जाऊन गरजू नागरिकांना ही मदत नुकतीच पोहचविली. तर दुसऱ्या टप्प्यात संस्थेकडून कोल्हापूर तसेच चिपळून मधील पूरग्रस्त भागात जीवनावश्यक साहित्याची मदत दिली जाणार असून ती संकलीत करण्याचे कामही सुरू करण्यात आल्याचे रायडर्सचे स्वयंसेवक संस्थापक अध्यक्ष प्रशांत कनोजिया आणि प्रविण पगारे यांनी सांगितले.
दोन आठवडयांपूर्वी कोकणासह, पश्चिम महाराष्ट्रात पावसाने महापूर आला होता.
त्यामुळे शेकडे कुटूंबे उधवस्त झाली असून नागारिकांचे जीवनावश्यक साहित्यपूराच्या पाण्यात वाहून गेले आहे. तसेच नागारिकांना पिण्यासाठी पाणीही उपलब्ध नाही. त्यामुळे सामाजिक भान जपत हेल्प रायडर्स संस्थेकडून सदस्यांसह, नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार, अनेक पुणेकरांनी मदतीचा हात पुढे करत संस्थेच्या सदस्यांकडे साहित्य जमा केले होते. त्यानुसार, साहित्याची विभागानी करून सुमारे 600 कुटूंबाना मदत देण्यात आली आहे. संस्थेच्या सदस्यांनी महाड येथे जाऊन ही मदत केली आहे. यावेळी सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाचे उल्हास रानडे, चंद्रशेखर चिंचोरे, जयश्री वानखेडे,गौरव बेडसगांवकर, राहुल जाधव, दुर्गाप्रसाद कनोजिया, जयंती अलुरकर ,पवन कनोजिया आदींसह नागरिक उपस्थित होते. महाडसह खरवली, सुतारवाडी, पंचशीलनगर, पोलादपूर, किंजलनगर, ब्राम्हणवाडी आदी पूरग्रस्त भागात ही मदत पोहचविण्यात आली. प्रशांत कनोजिया, सुदिन जायप्पा,अजित जाधव,प्रवीण पगारे ,अनुपम शहा, श्रीकांत कापसे ,बाळासाहेब ढमाले,प्रशांत महानवर ,अमोल गुंजाळ,संतोष पोळ,राहुल वाघवले ,श्रीकांत कुंभरे,उमेश थरकुटे,आकाश साळुंखे,निलेश टिंगरे,माधव चौधरी ,सुयोग ऐंचवार,परेश देशमुख निरंजन शिवरकर ,सौरभ भिलारे,केतन डोंगरे,विक्रम घुंगरूवाले,प्रसाद गोखले,निवास शिंदे,महेश बैजंत्री,
प्रथम कनोजियाया सदस्यांनी नियोजन केले.
पेट्रोल पंप मालकाची अशीही मदत
संस्थेकडून ही मदत कोकणात घेऊन जाण्यासाठी आशिष मते यांनी डिझेल व ड्रायव्हर मानधन घेऊन टेम्पो ट्रव्हलर उपलब्ध करुन दिली. हा जीवनावश्यक वस्तूंचा साठा घेऊन जात असताना, हे वाहन भूकूम येथील भारत पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी गेले होते, यावेळी पंपाचे मालक सचिन डेंग यांनी हेल्प रायडर्सच्या सदस्यांकडे या मदतीची माहिती घेतल्यानंतर, या वाहनाच मोफत इंधन देत या मदतकार्याला हातभार लावला.