पुणे : प्लास्टिक मुक्ती, पर्यावरण संवर्धन आणि शेतकरी समस्यांचे सादरीकरण करत वडगाव बुद्रुक येथील ज्ञानसाधना शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडले. गणेश कला क्रीडा मंच येथे रंगलेल्या या सोहळयात बालचमूंनी हिंदी, मराठी गाण्यांवर नृत्य सादर केले. लोप पावत चाललेल्या लोकसंस्कृती व लोकगीतांकडे दृष्टिक्षेप टाकत अस्सल मराठमोळ्या गीतांचा कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला. या वेळी विविधरंगी वेशभूषेतील शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रेक्षक वर्गाची मने जिंकली.
या कार्यक्रमास खडकवासला विधानसभेचे आमदार भिमराव तापकीर , संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक हरिदास चरवड, सचिव पूनम चरवड , उपाध्यक्ष केदार जाधव, बाळासाहेब जाधव, संजय पवळे, युवराज जाधव ,सिद्धेश पाटील,सुनिल कांबळे,छाया चरवड,रुपाली निवदेकर,जान्हवी जाधव, आदि मान्यवरांसह सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापक शिवराम डोईफोडे, मुख्याध्यापिका स्नेहल कदम ,वैशाली किजाबिले, राजश्री बोबडे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. विद्यार्थी प्रतिनिधी अमृता डोईफोडे,अपर्णा भोसकर,श्रेया दिग्गेकर,सुरज शिंदे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर यावेळी इयत्ता दहावीच्या परीक्षेत शाळेतून प्रथम आलेल्या भावेश म्हसकर,द्वितीय भाग्यश्री नाईकनवरे,तृतीय राधिका लिंबाळे यांचा सत्कार करण्यात आला तर सन 2019- 20 चा आदर्श विद्यार्थी पुरस्कार अर्जुन राठोड,सौरभ वाघमारे, साक्षी सोनवणे,सुरज शिंदे, या विद्यार्थ्यांना देण्यात आला.