सलमानच्या “राधे’मध्ये जॅकलीन फर्नांडिस आयटम सॉंग सादर करणार आहे. “राधे’ शी संबंधित सूत्रांनी ही माहिती दिली. सलमान सध्या प्रभुदेवाच्या दिग्दर्शनाखाली “राधे’मध्ये काम करतो आहे.सलमानच्या आतापर्यंतच्या सगळ्या सिनेमांमध्ये त्याची स्टाईल प्रेक्षकांना अगदी माहिती झाली आहे.
मात्र “राधे’मध्ये तो अगदी हटके अंदाजात दिसणार आहे. “राधे’मध्ये सलमानची हिरोईन म्हणून दिशा पाटणी असणार आहे. पण तिच्या शिवाय “राधे’मध्ये जॅकलीन फर्नांडिसही असणार आहे.
मात्र तिचा रोल नक्की कसा असेल, हे आतापर्यंत स्पष्ट केले गेलेले नाही. ती एक आयटम सॉंग सादर करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. सलमानच्या सिनेमामध्ये फक्त आयट्म सॉंग पुरते सहभागी होणे जॅकलीनला कदाचित आवडलेले नसावे. मात्र सलमानच्या इच्छेखातर ती हे आयटम सॉंग करायला तयार झाली असावी.