नगर – समाजवादी पार्टीची अहमदनगर शहर कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली असून, शहर उपाध्यक्षपदी मोहंमद हुसेन, सरफराज शेख, सचिव डॉ. फैजान इनामदार, महा सचिव फैजान शेख, कार्याध्यक्ष फरिद सय्यद, सरचिटणीस फिरोज पठाण यांची नियुक्ती करण्यात आली.
ही निवड समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार अबू आझमी यांच्या नेतृत्वाखाली, तर प्रदेश महासचिव जुल्फेकार आजमी यांच्या सहमतीने अध्यक्ष अजीम राजे यांनी जाहीर केली. तसेच सह चिटणीस मोइज शेख, विभाग प्रमुखपदी शाहबाज शेख, उजैर पठाण, अरबाज खान, समीर खान, अकील खान, प्रसिध्दी प्रमुखपदी वसीम शेख यांची नियुक्ती करण्यात आली.
पक्षाचे संघटन मजबुत करण्यासाठी शहरात लवकरच समाजवादी पार्टीची सभासद नोंदणी करण्यात येणार आहे. नुतन पदाधिकारी सामाजिक उत्तरदायित्व या भावनेने समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.