संगमनेर – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या संगमनेर शाखेतर्फे सदस्यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. देशात करोना व्हायरसने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीतही जीवाची पर्वा न करता करोनापासून सावधानता कशी घ्यावी, तसेच प्रशसनाचे नियम हे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम पत्राकार करत असतात. परंतु या महामारीत सामान्य पत्रकारांची कुठेही दखल घेतली जात नाही, अशी खंत संघटनेतील पत्रकारांनी व्यक्त केली होती.
अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष वसंतराव मुंढे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली व संगमनेर तालुका पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सोमनाथ काळे यांच्या हस्ते पत्रकार संघातीच्या सदस्यांना जीवनावश्यक साहित्याबरोबरच आर्सेनिक अल्बम- 30 गोळ्या, मास्क, पेन, डायरी, दिननदर्शिकांचे वाटप सोशल डिस्टन्सचे पालन करून वाटप करण्यात आले.
यावेळी संगमनेर पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सोमनाथ काळे, उपाध्यक्ष गोरक्षनाथ मदने, तालुका सचिव संजय गोपाळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, राजू नरवडे, नितीन ओझा, श्याम तिवारी, शेखर पानसरे, संजय साबळे, स्वानंद चत्तर, बाबासाहेब कडू, अमोल मतकर, भारत पडवळ, संदीप थोरात, आनंदा जोंधळे, सुखदेव गाडेकर, बाळासाहेब गडाख, आनंद गायकवाड, संजय अहिरे आदी सदस्य उपस्थित होते.