पळसदेव- शेलारपट्टा येथे जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त तंबाखू मुक्त शाळा व परिसर करण्याची शपथ नागरिकांनी घेतली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल नगरे, हनुमंत जावळे, पवार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रामदास पवार, सोमनाथ शिंदे, रोहिदास जावळे, दत्तात्रय जावळे, अजय बनकर,महादेव इंजे, अमर इंजे, सुनील नगरे, महेंद्र घाडगे, सुभाष शेलार, उमेश पवार, चंद्रकांत जावळे, अक्षय जावळे, मयूर वागसकर, रमेश पवार, शंकर नगरे, नागरिक उपस्थित होते.