सातारा, दि. 2 (प्रतिनिधी) –
माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते शेखर गोरे हे शुक्रवार, दि. 4 रोजी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
शेखर गोरे यांनी दीड-दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश करून तालुक्यात मरगळ आलेल्या पक्षाला नवसंजीवनी दिली आहे. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे युतीमध्ये माण-खटाव हा हक्काचा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळणार, असे शिवसैनिकांना वाटत असताना हा मतदारसंघ जागावाटपात भाजपकडे गेला आहे.
भाजपने माजी आमदार जयकुमार गोरे यांची उमेदवारी निश्चित केल्याने शेखर गोरे कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. आता त्यांनी शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण असलेले झेंडे व शिवसेना नेत्यांचे फोटो बरोबर घेऊन कार्यकर्त्याना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहण्याचे अवाहन केले आहे.
शुक्रवार, दि. 4 रोजी सकाळी 9.30 वाजता दहिवडीत रॅली सुरू होणार असून कार्यकर्त्याच्या उपस्थितीत शेखर गोरे हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत