पुणे : सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर मधील सिध्देश्वर मंदीर देवस्थानच्या वतीने महाशिवरात्री उत्सवा निमित्ताने शिवमंदीर आकर्षक फुलांच्या सजावटीने सजविण्यात आले होते. यावेळी भगवान शंकराचे तांडव नृत्य रंगबिरंगी फुलांनी साकारण्यात आले होते. तसेच मंदीराच्या वतीने भाविकांसाठी फराळाचे आयोजनही करण्यात आले होते.
आनंदनगर येथील जाणता राजा ग्रुपच्या वतीने दरवर्षी मोठया उत्साहात महाशिवरात्री साजरी करण्यात येते. साईनाथ सपकाळ, अक्षय मालेगांवकर सौरभ शिंदे, रोहित शिंदे,स्वप्निल रासने, प्रविन डुंबरे, राहूल वाईकर, आशिष केंगार, आकाश मालेगांवकर, अजय शिराळ ,अक्षय घोरपडे, मयुर गाडे, किरण देशमाने, श्रीनिवास कोळी यांनी या उत्सवाचे संयोजन केले.