मांडवगण फराटा-शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील तांदळी, मांडवगण फराटा, वडगाव रासाई, आंधळगाव, नागरगाव, कुरूळी, कोळगाव डोळस आदी गावांत सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. ऐन दुष्काळात उभी असलेली चारा पिके व ऊस आदी पिके वादळात आडवी झाली. पावसाचा शिडकावा झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाऊस अचानक आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.