भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याची मुलगी झिवा यांचे व्हिडियो कायम चर्चेचा विषय ठरतात. झिवाचे गोड फोटो आणि व्हिडीओ धोनीने सोशल मीडियावर पोस्ट करताच ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.
दरम्यान, आज देशभरामध्ये पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक सुरु असून कॅप्टन कुल अर्थात महेंद्र सिंह धोनीने देखील आज मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानानंतर धोनीने आपली लाडकी लेक झिवा हिच्या सोबतच एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला असून या व्हिडिओमध्ये झिवा सर्वांना मतदानाचा हक्क बजावण्याचा सल्ला देताना दिसत आहे.
https://www.instagram.com/p/BxHZXhrlCH1/?igshid=1oql0rpzn2oud