मुंबई – अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री अमृता खानविलकर हे दोघे ‘वेलडन बेबी’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटात त्या दोघांसोबतच अभिनेत्री वंदना गुप्ते या देखील झळकणार आहेत, अशी माहिती चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर दिली आहे.
#Announcement: Pushkar Jog, Amruta Khanvilkar and Vandana Gupte in #Marathi film #WellDoneBaby… Directed by Priyanka Tanwar… Produced by Anand Pandit, Mohan Nadaar and Pushkar Jog… Filming from 21 Oct 2019 in #London. pic.twitter.com/VzIjL9G5j6
— taran adarsh (@taran_adarsh) October 8, 2019
या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियांका तन्वर या करणार आहेत, तर आनंद पंडित, मोहन नाडार, आणि पुष्कर जोग या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. दरम्यान, 21 ऑक्टोबरपासून लंडनमध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे. या चित्रपटात अजून कोणते कलाकार काम करणार ही माहिती सध्या गुलदस्त्यात आहे.